चलेन
चलेन : नॉर्वे व स्वीडन यांच्या सीमेवरील पर्वतश्रेणी. हीचे सर्वोच्च शिखर केब्नकाइस (२,१२३ मी.) असून इतर लहानमोठी शिखरे १,८०० मी.पेक्षा उंच आहेत. आकावरे, मार्कोटन, साऱ्येक्टयाक्को, टारेकाइस रेप्पेंटयाक्को, कुस्ट्रकाइस, सूलिट्येलमा, पार्टेलायेट ही शिखरे महत्त्वाची आहेत.